समाप्त करा

    संकेतस्थळाचे नियम आणि अटी

    वेबसाइट धोरणे वापर अटी (Terms of Use)

    या वेबसाइटवरील सामग्रीचे व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (Maharashtra State Legal Services Authority) करत आहे.
    या वेबसाइटवरील मजकूर अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत, तरीही यातील माहितीला कायद्याचे विधान समजू नये किंवा कोणत्याही कायदेशीर उद्दिष्टांसाठी वापरू नये.
    या पोर्टलच्या वापरामुळे किंवा डेटाच्या वापरात येणाऱ्या अडचणींमुळे होणाऱ्या थेट किंवा अप्रत्यक्ष, परिणामी नुकसान, हानी किंवा खर्चासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.
    या पोर्टलवर सार्वजनिक सोयीसाठी इतर वेबसाइट्सचे दुवे (links) समाविष्ट केलेले आहेत. मात्र, अशा दुव्यांची उपलब्धता सर्व वेळ हमीपूर्वक सांगता येत नाही.
    ही अटी व शर्ती भारतीय कायद्यांच्या अधीन राहतील आणि त्यानुसारच त्यांचे अर्थ लावले जातील. या अटी व शर्तींशी संबंधित कोणताही वाद उद्भवल्यास तो भारतातील न्यायालयांच्या विशेष अधिकारक्षेत्रात राहील.

    प्रताधिकार धोरण

    या वेबसाइटवरील सामग्री योग्य परवानगी घेतल्यानंतर विनामूल्य पुनरुत्पादित (reproduce) केली जाऊ शकते. तथापि, सामग्री अचूकपणे पुनरुत्पादित केली पाहिजे आणि कुठल्याही अपमानास्पद किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भात वापरली जाऊ नये. सामग्री इतरत्र प्रकाशित करताना किंवा वितरीत करताना स्त्रोताचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
    तथापि, ज्या सामग्रीवर तृतीय पक्षाचा प्रताधिकार (copyright) असल्याचे नमूद केलेले आहे, त्या सामग्रीचे पुनरुत्पादन करण्यासाठी संबंधित विभाग/प्रताधिकार धारक यांची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे.

    गोपनीयता धोरण

    ही वेबसाइट आपल्याबद्दल कोणतीही व्यक्तिगत माहिती जसे की नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ता स्वयंचलितरित्या नोंदवत नाही.
    जर वेबसाइटकडून वैयक्तिक माहिती मागितली गेली, तर ती माहिती कोणत्या उद्देशासाठी घेतली जात आहे याची आपणास पूर्वकल्पना दिली जाईल, तसेच आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जातील.
    वेबसाइटवर आपण स्वेच्छेने दिलेली वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला (सार्वजनिक/खाजगी) विकली किंवा शेअर केली जाणार नाही. येथे दिलेली सर्व माहिती अनधिकृत प्रवेश, वापर, प्रकटीकरण, बदल किंवा नष्ट होण्यापासून सुरक्षित ठेवली जाईल.
    आम्ही वापरकर्त्यांची काही तांत्रिक माहिती जसे की इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्ता, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ, तसेच भेट दिलेल्या पृष्ठांची नोंद ठेवतो. साइटला हानी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्याशिवाय, आम्ही या माहितीचा वापर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी करीत नाही.

    हायपरलिंकिंग धोरण

    बाह्य वेबसाइट्स/पोर्टल्ससाठी दुवे

    या वेबसाइटवर अनेक ठिकाणी बाह्य वेबसाइट्स/पोर्टल्सचे दुवे प्रदान केलेले आहेत. हे दुवे केवळ आपल्या सोयीसाठी दिले आहेत. मात्र, हे दुवे सर्व वेळ कार्यरत राहतील याची हमी आम्ही देऊ शकत नाही, तसेच त्यातील पृष्ठांच्या उपलब्धतेवर आमचे नियंत्रण नाही.

    संग्रह धोरण

    राज्य संस्थेसंबंधित सामग्री ही सामान्य स्वरूपाची असल्यामुळे तिच्यासाठी कोणतीही विशिष्ट कालमर्यादा नसते. त्यामुळे ती सामग्री सतत वेबसाइटवर उपलब्ध राहते.
    तथापि, कार्यक्रम, निविदा, भरती आणि जाहीरातींशी संबंधित सामग्रीला निश्चित कालावधी असतो. हा कालावधी संपल्यावर संबंधित सामग्री स्वयंचलितरित्या ऑनलाईन संग्रह विभागात हलवली जाते.