समाप्त करा

    माजी प्रमुख आश्रयदाते

    Former Patron in Chief

    माजी प्रमुख आश्रयदाते

    माननीय श्री न्यायमूर्ती आलोक आराधे
    माजी मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय

    १३.०४.१९६४ रोजी जन्म. बी.एस्सी. आणि एलएल.बी. शिक्षण पूर्ण केले. १२.०७.१९८८ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दिवाणी व घटनात्मक, लवाद (Arbitration) आणि कंपनी विषयक प्रकरणांमध्ये वकिली केली. एप्रिल २००७ मध्ये वरिष्ठ वकील (Senior Advocate) म्हणून नामांकन झाले.

    एम.पी. जैन आणि एस.एन. जैन लिखित Principles of Administrative Law या पुस्तकाच्या ५व्या व ६व्या आवृत्त्यांचे तसेच दिवंगत माननीय न्यायमूर्ती जी.पी. सिंग (मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती) लिखित Principles of Statutory Interpretation या पुस्तकाच्या १५व्या आवृत्तीचे पुनरावलोकन (Revised) केले.

    २९.१२.२००९ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि १५.०२.२०११ रोजी कायम न्यायाधीश (Permanent Judge) झाले.

    २०.०९.२०१६ रोजी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली होऊन त्या पदाची शपथ घेतली. ०७.०६.२०१७ रोजी जम्मू आणि काश्मीर राज्य न्यायिक अकादमीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन झाले. ११.०५.२०१८ रोजी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि १०.०८.२०१८ पर्यंत त्या पदावर कार्य केले. ०४.०९.२०१८ रोजी जम्मू आणि काश्मीर राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन झाले.

    कर्नाटक उच्च न्यायालयात बदली झाल्यानंतर, १७.११.२०१८ रोजी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ०३.०७.२०२२ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला आणि १४.१०.२०२२ पर्यंत त्या पदावर कार्य केले. बेंगळुरू मध्यस्थी केंद्र, लवाद आणि सलोखा केंद्र तसेच कर्नाटक न्यायिक अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले.

    १९.०७.२०२३ रोजी तेलंगणा राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि २३.०७.२०२३ रोजी पदाची शपथ घेतली.

    मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली होऊन २१.०१.२०२५ रोजी दुपारी पदभार स्वीकारला.